शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरीत शिवजयंती साजरी

रत्नागिरी : आज १९ फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब माने, शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख सलील डाफळे, तनवीर मुजावर, अमित खडसोडे, संदेश भिसे, शकील मालदार, राजन शेट्ये, प्रशांत सुर्वे, उपविभागप्रमुख दिलावर गोदड, संतोष सावंतदेसाई, विकास सावंतदेसाई, विराज माने, समीर आखाडे, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, सौ. राजश्री शिवलकर, उपशहरसंघटक सौ. सेजल बोराटे, उपशहर संघटक श्रीमती उन्नती कोळेकर, विभागसंघटक सौ. अमृता पाटील, राजश्री लोटणकर, उल्का पुजारी, हीना दळवी, स्मिता काटकर, मिताली पवार, सलीहा वस्ता, पूजा जाधव उपस्थित होते.




