राज्य तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील एसआरके क्लबच्या खेळाडूंचे घवघवीत यश

रत्नागिरी : बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या खुल्या राज्य तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील एसआरके तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी सहभाग होत ४ सुवर्ण, १ रौप्य, तर ४ कांस्यपदकांवर आपले नाव कोरले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई मार्गदर्शनाखाली पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने योगीराज तायक्वांदो अकॅडमी पुणे येथे आयोजित पाचवी खुल्या राज्य तायक्वांदो स्पर्धा २०२५ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी माळुंगे पुणे येथे १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातून १८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पदक विजेता खेळाडूंची नावे अशी : सुवर्णपदक- स्वरा साखळकर (क्यूरोगी पुमसे), मृण्मयी वायंगणकर, रोहित कुंडकर. रौप्य पदक- गार्गी घडशी, कांस्यपदक- तुळजा हर्ष, ओम अपराज, प्रांजल लांजेकर, आयुष चव्हाण. सहभाग- आराध्य सावंत.
या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हातीसकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.



