Uncategorized

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड काढून घ्या : कीर्तीकिरण पुजार

रत्नागिरी : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाते त्याला गोल्डन कार्ड म्हणतात.या कार्ड च्या सहाय्याने प्रतिकुटुंब ५ लाखापर्यंत उपचार तसेच शस्त्रक्रिया मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता : लाभार्थी महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार सर्व अंतोदय, पिवळे, केशरी, पांढरे रेशन धारक असावा. आशा वर्कर, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र, रुग्णालयातील मित्राकडे तसेच स्वतः लाभार्थी काढू शकतो. आवश्यक कागदपत्र: ऑनलाईन १२ अंकी रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड व त्याच्याशी सल्लग्नित मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी

योजनेचा लाभ कुठे मिळेल- योजनेत अंगीकृत असलेली रुग्णालये. लाभ घेण्यासाठी लागणारी कागद पत्रे कोणती- ओरिजनल रेशन कार्ड, आयुष्मान भारत ई कार्ड, ओरिजनल आधार कार्ड (रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे). योजनेअंतर्गत ३४ स्पेशालिटी मध्ये कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्र मार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, बाल रोग, स्त्रीरोग, नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), सांधेरोपण इत्यांदीवर एकूण १३५६ गंभीर आजारांवरती प्रति कुटुंब ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळेल.

मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पूजार यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग तसेच इतर विभागाच्या समन्वयाने रत्नागिरी जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढणेकामी विशेष मोहीम राबविली जात आहे. सध्या पात्र असलेल्या ४.२६ लाख कुटुंबातील १६.२८ लाख लाभार्थ्यांपैकी ५.३६ लाख लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार झालेले आहेत.

उर्वरित लाभार्थ्यांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पुजार यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या जवळील आशाताई किंवा आपले सरकार केंद्र ग्रामपंचायत मधील केंद्र चालक यांच्याद्वारे आपली केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ई केवायसी साठी आधार कार्ड आधारशी संलग्न मोबाईल नंबर तसेच अपडेटेड रेशन कार्ड आवश्यक आहे.आपले नाव यादीमध्ये दिसत असल्यास आपण आपले केवायसी पूर्ण करून घेऊ शकतो.तरी सर्वांनी आपल्या जवळील आपले सरकार केंद्र किंवा आशाताई किंवा संलग्न रुग्णालयामध्ये आपले नाव यादीमध्ये आहे का याची नोंद घेऊन नाव असल्यास ही केवायसी करून घ्यावी आपण स्वतः देखील आयुष्मान ॲपद्वारे आपली केवायसी अँड्रॉइड फोनच्या मदतीने करू शकतो.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.jeevandayee.gov.in व www.pmjay.gov.in

टोल फ्री क्रमांक : महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना :१५५३८८/१८००२३३२२००

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना : १४५५५ / १८००१११५६५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button