मुख्य बातमी

पोस्ट वेतनधारकांसाठी २५ फेब्रुवारीला पेन्शन अदालत

१० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांनी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांचे कार्यालय, पणजी येथे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली आहे. विहीत प्रपत्रामध्ये अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी असून मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधीक्षकांनी कळविले आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (कॅट/कोर्ट केसीस), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. संबंधितानी आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी, सचिव, पेंशन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे अथवा accts.goa@indiapost.gov.in. ई-मेलवर पाठवावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button