ओझरे खुर्द गटातील मोर्डे ब्राम्हण वाडी व तांबळ वाडी ग्रामस्थांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

संगमेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद ओझरे खुर्द गटातील मोर्डे ब्राम्हण वाडी व तांबळ वाडी येथील ग्रामस्थांचा लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
जि.प. ओझरे खुर्द गटातील मोर्डे ब्राम्हण वाडी व तांबळ वाडी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी आमदार सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) रत्नागिरीचे राहुल पंडित उपस्थित होते.
गणेश विठ्ठल गुरव, संतोष गणेश गुरव,अजित गणेश गुरव, बबन श्रीराम लाड, सुरेश आत्माराम लाड, प्रकाश तुकाराम आमटे, यशवंत आत्माराम लाड, मयुर माधव चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रवेश केला.
यावेळी आमदार सामंत यांनी कोणतेही काम असो आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले.



