मुख्य बातमीराजकीय
बंड्या साळवी यांचा तालुकाप्रमुख पदासह सदस्यत्व पदाचा राजीनामा

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पहिली प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राजीनाम्यानंतर लवकरच साळवी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.



