शैक्षणिक

स्वरूप रेंदाळकरचे ‘जेईई-मुख्य’ परीक्षेत यश

नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी

स्वरूप रेंदाळकर

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणारा स्वरूप प्रमोद रेंदाळकर याने नुकत्याच झालेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मुख्य) परीक्षेत ९६.१५ टक्के गुण मिळवून यशस्वी झाला.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘जेईई-मुख्य’ परीक्षा दोन सत्रामध्ये घेतली जाते. यातल्या पेपर एकचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. घरातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वरूपने हे यश संपादन केले आहे. आता पुढील टप्पा ‘जेईई ऍडव्हान्स’चा असून या सत्राची परीक्षा ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणार आहे.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वरूपचे कौतुक केले असून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button