नवनिर्माण हाय सी.बी.एस.ई. बोर्डाच्या बारावी 100%निकाल

रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेचा इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यावर्षीही शाळेने आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
इयत्ता बारावीतील सई सावंतने प्रथम क्रमांक आर्या कदम हीने व्दितीय क्रमांक पटकाविला. आर्या भस्मे ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
अनेक विषयात ९०पेक्षा जास्त गुण मिळवून अनेक विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.
या विद्यार्थ्यांना समन्वयिका सीमा हेगशेट्ये , अलमास लांबे, सोनाली मसुरकर, मुफर्रा काझी , काव्या शिर्के यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकवर्गाचे संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांनी अभिनंदन केले या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्वायत्त अशा सी.बी.एस.ई. बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी बसतातया अभ्यासक्रमाचा फायदा विविध स्पर्धा परीक्षेसाठी होतो.
या विद्यार्थ्यांना एस एम जोशी विद्यानिकेतन संकुलातच उच्च शिक्षणासाठी अनेक दर्जेदार संधी उपलब्ध असल्याने त्यांनी व तसेच अन्य विद्यार्थ्यांनीही लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले आहे.



