मुख्य बातमीशैक्षणिक

जेईई-मुख्य परीक्षेत नवनिर्माण हायचा क्रिश सिंग उत्तीर्ण

क्रिश सिंग

रत्नागिरी : नवनिर्माण हाय सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये (CBSE Affiliated) बारावी विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या क्रिश सिंग या विद्यार्थ्याने जेईई मेन्स या परीक्षेत ९२.६ पर्सेंटाईल गुण मिळवून यश मिळवले आहे. ही परीक्षा भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry)आणि गणित (Mathematics)या विषयांवर आधारित होती.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य घेतली जाते. ‘एनटीए’ने जानेवारी सत्रातील जेईई-मुख्य परीक्षा २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ५४४ परीक्षा केंद्रांवर संगणकीय पद्धतीने घेतली. या परीक्षेसाठी १२ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ११ लाख ७० हजार ४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. माराठीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जेईई-मुख्य परीक्षा दोन सत्रामध्ये घेतली जाते. यातल्या पेपर एकचा निकाल काल (ता. १३) जाहीर करण्यात आला.
आता पुढील टप्पा ‘जेईई ऍडव्हान्स’चा असून या सत्राची परीक्षा ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, शिक्षक गौरव गोसावी (फिजिक्स), सोनाली मसुरकर (रसायनशास्त्र), काव्या शिर्के (गणित) यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रिशला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button