मुख्य बातमी

निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी कॅन्टीन मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सीएसडी कॅन्टीन चिपळूणसाठी निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांकडून कॅन्टीन मॅनेजर पदाच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी हेडक्वाटर्स, दक्षिण महाराष्ट्र ॲण्ड गोवा सब एरिया (कॅन्टीन विभाग) ९०० ४४९, द्वारा अे.पी.ओ. यांना लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या पदाकरिता कॅन्टीन व्यवस्थापक समितीकडून दरमहा ४५ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button