मुख्य बातमी

मकरसंक्रांती सणानिमित्त रत्नागिरीत ग्राहक पेठेचे आयोजन

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा अंतर्गत येणाऱ्या युवाब्रह्म तर्फे मकरंसंक्रांती निमित्त ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्राहक पेठ श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, साळवी स्टॉप नाचणे लिंक रोड रत्नागिरी येथे भरविण्यात येणार आहे.

या ग्राहक पेठेमध्ये रत्नागिरीकरांना आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री सोबतच, चटकदार पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. या मध्ये आकर्षक वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने तसेच विविध प्रकारचे खाद्य पदार्थ या सारखी अनेक उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी असणार आहेत. रत्नागिरीकरांना मकरसंक्रांतीच्या सणाबरोबरच महिलांना नवीन वर्षातील खरेदी ही एकाच छताखाली करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button