मुख्य बातमी

रत्नागिरीत भाजपा सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात

नीलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ६साठी केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाला शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधून जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यामध्ये भाजपाचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली होती. आता जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सर्व मंडल स्तरावर, बूथ स्तरावर सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. सभासद नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे काम पाहत आहेत.

दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभाग क्रमांक ६ मध्ये अभ्युदय नगर येथून शहर सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपा कार्यकर्ते नीलेश आखाडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सहासाठी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे देखील अनावरण करण्यात आले.

शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातली सर्व प्रभागांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले. सभासद नोंदणी अभियान आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रूमडे, शोनाली आंबेरकर, राजेंद्र पटवर्धन, संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, प्रविणचंद्र हर्डीकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, मंदार खंडकर, श्री. सावंत, प्रज्ञा टाकले, प्रवीण रुमडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button