मुख्य बातमी

चिपळूणमध्ये ३० डिसेंबर रोजी नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा

रत्नागिरी : नौदलाच्या माजी सैनिकांचा भव्य मेळावा सोमवारी (३० डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता यांनी या मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे जिल्ह्यामधील फक्त नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पितांसाठी आय. एन. एस. हमला, मोर्वे, मालाड, मुंबई यांच्यातर्फे ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन विषयक, मेडिकल व स्पर्श (SPARSH) विषयक व इतर अभिलेख विषयक अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या अडी-अडचणींचे निरसन करू शकता. त्यासाठी आपल्या सोबत पीपीओ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सोबत आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच डिर्स्चाज बुक, PART II ORDER च्या कॉपी (असल्यास), पॅन कार्ड, ईसीएचएस कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, इत्यादी घेऊन मेळाव्यात उपस्थित राहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button