मुख्य बातमी
जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना पदोन्नती
जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप समारंभ

रत्नागिरी : जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांची सहायक पोलीस आयुक्त, बृहन मुंबई या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा आज (२१ डिसेंबर) निरोप समारंभ आज आयोजित केला होता.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्री. सणस यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थिती होते.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी शैलेश सणस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



