मुख्य बातमी

कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास

रत्नागिरी : कोकणच्या जैवविविधतेत भर घालणारी आणि वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास असल्याचा पुरावा समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे सापडले आहेत. चिपळूण तालुक्यातील शिरगांव, तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे आढळले आहेत.

तसेच या वाघाने केलेली शिकार देखील आली आढळून आली आहे. पट्टेरी वाघाचे ठसे सापडल्यामुळे वन्यप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण असून, पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याच्या खुणा सापडल्याने वनविभागाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button