मुख्य बातमीशैक्षणिक

“नवनिर्माण हाय”तर्फे आशा सेविकांचा सन्मान 

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्यासाठी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दुसऱ्यांच्या मनामध्ये जीवनाविषयी प्रेम निर्माण करणारी भावना, म्हणजेच आशा. केंद्रशासनाने १२ एप्रिल २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात केली. या स्वयंसेविका शासन आणि खेड्यातील लोक यांच्यातील दुवा म्हणून कार्य पार पाडत असतात. समाजातील अगदी शेवटच्या घटकांपर्यत त्या सेवा पुरवत असतात. या अभियानाअंतर्गत विशेषता ग्रामीण पातळीवर आरोग्यसंद‌र्भात लोकांचे प्रबोधन करणे व जनजागृती करणे या दृष्टीने अशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या कामाचे स्वरूप म्हणजेच आरोग्याबाबत लोकांमध्ये सामाजिक व मानसिक परिवर्तन घडवून आणणे, आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी गावातील लोकांना प्रोत्साहित करणे, साध्या आजारावर किंवा साथीच्या रोगांवर प्राथमिक सेवा उपचार पुरवणे, महिलांची प्रसुतीपूर्व तपासणी व त्यांचा आहार यांची काळजी घेणे व पुरवठा करणे, प्रत्येक जन्माची व मृत्यूची नोंद ठेवणे. कोरोना काळात तर आशा कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून रुग्णांना औषध पुरवठा केला होता. प्रसंगी त्यामध्ये त्याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांच्या या धाडसाची आठी कार्याची दखल घेत WHO ने भारतातील दहा लाख ‘आशा वर्कर्सना “ग्लोबल हेल्थ लिडर’ अवॉर्ड देऊन सन्मानित केले.

आशा कार्यकर्त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आपली सेवा बजावतानाच त्यांनाही आनंदाचे, विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत, त्यांचेही मनोरंजन व्हावे, त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी सांगितले.

यावेळी आशा कार्यकर्त्यांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची, स्ट्रो ने वाटाणे उचलणे या फनी गेम्सचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व उपस्थित आशा सेविकांनी सहभाग घेतला आणि खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी मनोगत व्यक्त करताना आशा सेविका स्वप्नाली मुलुक यांनी उत्साह वाढल्याचे सांगितले. आदिती जाधव यांनीही कार्यक्रम खूप छान झाल्याचे नमूद करतानाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आल्याचे सांगितले. तर मैथिली सनगरे यांनी खास आशांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आनंद झाला. आशा सेविकांची दखल “नवनिर्माण”ने घेतली अशी दखल कुणीच घेतली नव्हती. या कार्यक्रमासाठी आम्ही खूपच उत्सुक असल्याचे सांगितले.

याप्रसंगी नवनिर्माण हायच्या संचालिका सौ. हेगशेट्ये, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, शिक्षिका गीतांजली सावंत, संगीता सहानी, निखिल कांबळे उपस्थित होते. दरम्यान या खेळांमधून काही यशस्वी झालेल्या सेविकांना नवनिर्माण हायच्या वार्षिक स्नेहसंमेलना दिवशी म्हणजेच २८ डिसेंबरला बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button