मुख्य बातमीराजकीय

महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यानिमित्त रत्नागिरीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्री पदे

रत्नागिरी : राज्य स्थापन झालेल्या माहिती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी सोहळा झाला. कोकणातील काही आमदारांचा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तर काही आमदारांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रीपदी तसेच आमदार योगेश कदम यांना देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिपदाची लॉटरी मिळाली आहे. आमदार सामंत आणि आमदार कदम यांच्या रूपात जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.

आमदार सामंत यांनी मंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. सामंत यांनी शपथ घेताच शहरातील जयस्तंभ येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या शपथविधी सोहळ्यानिमित्त रत्नागिरीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा करण्यात आला.

शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सामंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले. ते म्हणाले की “महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज नव्या सदस्यांनी राजभवन, नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये, राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची मी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला दिलेली जबाबदारी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारत असून लोकसेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button