मुख्य बातमी
जिंदाल कंपनीने बाधित विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाखांची मदत दोन करावी
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांची मागणी

रत्नागिरी : जिंदाल कंपनीच्या वायू गळतीचा फटका ६८ विद्यार्थी आणि एका महिलेच्या जीवावर बेतला. तयाला कंपनीचा हलगर्जीपणाच जबाबदार असून, बाधित ६९ जणांना प्रत्येकी दोन लाख रुपये जिंदाल कंपनीने द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली.
ते म्हणाले की, वायू गळतीच्या तक्रारीबरोबर कोळशाची पावडर आणि राख या परिसरातील वस्तीवर पसरते ,त्या विषयी ही नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा अधिकारी प्रदूषण मंडळ यांच्याकडे जनतेने तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. तसेच हे वायुगळती प्रकरण थोडक्यात निभावले, भोपाळसारखी दुर्घटना घडली असली तर मोठे संकट ओढवले असते, अशी चिंता यावेळी त्यांनी व्यक्त केली.



