मुख्य बातमी

आबालवृद्धांसाठी भगवद्गीता उपयोगी : डॉ. दिनकर मराठे

रत्नागिरी उपकेंद्रात गीता जयंती साजरी

रत्नागिरी : प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार गीता प्रत्येकाला उपयोगी आहे. बालकांसाठी बालसाहित्य म्हणून, थोरा-मोठ्यांसाठी एक तत्त्वज्ञान म्हणून, तर युवकांसाठी व्यवस्थापन शास्त्र म्हणून गीतेकडे पाहिले जाते. त्यामुळे आबालवृद्ध अशा सर्वांसाठी गीता उपयोगी असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र येथे बुधवारी गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

त्यानिमित्ताने उपस्थितांना संचालक डॉ. मराठे यांनी उद्बोधन केले. शिवाय गीतेतील १२ व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, रत्नागिरी उपकेंद्रातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button