रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनतर्फे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनतर्फे १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होईल.
सिंगल्स, डबल्स आणि लकी डबल्स अशा विविध गटांमध्ये स्पर्धकांना भाग घेता येईल. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी www.mbasso.in या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक ते शुल्क भरून ११ डिसेंबरपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
या रत्नागिरी बॅडमिंटन सब ज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट रोटे. हिराकांत साळवी आणि सेक्रेटरी रोटे. डॉ. संदीप करे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी रोटे. बिपिनचंद्र गांधी (9403507507), रोटे. नीलेश मलुष्टे (9422430044) यांच्याशी संपर्क साधावा.



