मुख्य बातमी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या स्वयंसेवकांची “आविष्कार”ला भेट 

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सौ. सविता कामत अविष्कार शाळेला भेट दिली.

या भेटीदरम्यान दिव्यांग मुलांसमवेत वेळ घालवून बौध्दिक खेळाचे आयोजन केले होते. यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक सौ. मानसी कांबळे आणि तेथील सर्व शिक्षकवृंदाने स्पर्धा आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य केले.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button