फिटनेस फंडामुख्य बातमी
रत्नागिरीकरांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबीर

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण १५ दिवसांचा असून हे शिबीर १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मोफत शिबीर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरीकरांना प्राप्त होणार आहे.
इच्छुक नागरिकांनी येथे क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी. तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



