मुख्य बातमी

रत्नागिरीतील पुतळ्यांची २ ते ५ डिसेंबरदरम्याने  होणार रेडिओग्राफी

परिसरातील वाहतूक बंद राहणार

रत्नागिरी : नगरपालिका हद्‌दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी केली जाणार आहे. यामुळे परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. याचा पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असल्याने . सुरक्षिततेसाठी २ ते ५ डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येत आहेत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की पोलीस अधीक्षकांकडील प्राप्त अहवालात त्यांनी २ डिसेंबर ते ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यत नगरपालिका हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याकामी पुतळ्याच्या परिसरातील रस्ते बंद करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २ ते ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यत रत्नागिरी नगरपालिका ह‌द्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्यात येणार असल्याने, हे काम करतेवेळी परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. त्यामुळे पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असल्याने, हे रस्ते बंद करण्यात येत आहेत. वाहतुकीची कोंडी होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button