मुख्य बातमीशैक्षणिक

२ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचे ‘मेनू-२५’ शिबीर उत्साहात

रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी कार्यालयाकडून राष्ट्रीय स्तरावरील मेनु-२५ हे वार्षिक प्रशिक्षण शिबीर ५ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात आले. या शिबिराचा समारोप काल (१४ नोव्हेंबर) झाला.

शिबिराचे प्रमुख सुत्रधार २ महा नेवल युनिट एनसीसीचे, समादेशक अधिकरी कमांडर के राजेश कुमार यांच्या मागदर्शनाखाली हा मेनु- २५ हा कॅम्प रत्नागिरी ते वरवडे, जयगड, तवसाळ, बोरीया येथे यशस्वीरित्या पार पडला. यात राष्ट्रीय छात्र सेनेच्या एकूण ६० मुला व मुलींचा सहभाग होता. संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट यात सहभागी झाले आहेत.

या दहा दिवसांच्या कालावधीत स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान “हमारा समुद्र हमारी शान” याबाबत पथनाट्यातून एनसीसीच्या छात्रांनी सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच रॅपलिंग, ट्रेकिंग, ॲडवेंचर असे विविध उपक्रम राबवले.

या कॅम्पमध्ये एकूण २ नेव्ही अधिकीरी, २ एनसीसी अधिकारी व १ जेसीआय, ९ नेव्ही कर्मचारी, १ अर्मी कर्मचारी, ७ सिव्हिल स्टाफ असे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button