मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

राजापूरमध्ये चिरेखणीवर सापडले १३ बांगलादेशी नागरिक

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

राजापूर : तालुक्यात खाणीवर काम करणाऱ्या १३ बांगलादेशीय नागरिकांना रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांना दहशतवाद विरोधी शाखेकडून या १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

हे बांगलादेशीय नागरिक जून २०२४ पासून ते आजपर्यंत आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ यांचे चिरेखणीवर कालरकोंडवाडी, ता. जि. रत्नागिर) येथे मौजे नाखरे यांच्याकडे कामाला होते. याची गोपनीय माहिती रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार या १३ जणांकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे ते अनधिकृतरित्या भारतात आल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी येथील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही दमदार कामगिरी केली आहे.

आज १२ नोव्हेंबर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पकडलेले बांगलादेशी नागरिक पुढील प्रमाणे : १) वहीद रियाज सरदार (वय ३५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश), २) रिजाऊल हुसेन करीकर (५० वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, ठाणा केशबपुर राज्य ढाका, देश बांग्लादेश), ३) शरिफुल हौजीआर सरदार (२८ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश), ४) फारुख मंहमद जहीरअली मुल्ला (५० वर्षे, रा. ठाणा शरशा, तहसिल कैबा, जि. जसोर देश बांग्लादेश), ५) हमिद मुस्तफा मुल्ला (४५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश), ६) राजु अहमद हजरतअली शेख (३१ वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, ठाणा केशबपुर राज्य ढाका, देश बांग्लादेश), ७) बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार वरा (२९ वर्षे रा. तहसिल कलारोवा, जि. सान कलारोवा, देश बांग्लादेश), ८) सैदुर रेहमान मोबारक अली (रा. पसल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश), ९) आलमगिर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४ वर्षे, रा. पाईकपरा, पोस्ट कामाराली, जि. साथखिरा, देश बांग्लादेश), १०) मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार, (३२ वर्षे, रा. गांव बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा, तहसिल कलारोवा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश), ११) मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८ वर्षे, रा. बाशबरी, जि. जसोर, ठाण केशबपुर देश बांग्लादेश), १२) मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५ वर्षे, रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, देश बांग्लादेश), १३) मोहम्मद लालटु मोंडल (३७ रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, देश बांग्लादेश). सध्या हे सर्व आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ यांच्या चिरेखणीवर मौजे नाखरे कालरकोंडवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्याकडे राहत होते.

हे १३ जण बांग्लादेशी नागरिक असून ते जून २०२४ पासून आजपर्यंत ते बांग्लादेशी नागरिक असताना देखील कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत- बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून नाखरे ग्रामपंचायत हद्दीतील कालकरकोंड वाडी (ता. जि. रत्नागिरी) येथे आसिफ सावकार यांच्या चिरेखणीवर अवैधरित्या वास्तव करीत असल्याचे आढळून आले.

या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button