क्रीडामुख्य बातमी

नवनिर्माण शिक्षण संस्थेत मोहन खातू क्रीडा संकुलाचे ज्येष्ठ सिने निर्माते नितीन वैद्य यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पहिल्या इंडोअर बास्केटबॉल कोर्ट असलेल्या मोहन खातू क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ सिने निर्माते नितीन वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि खातू कुटुंबीय यांची प्रमुख होती.

नवनिर्माण शिक्षण संस्थेला यंदा २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे आयोजन २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच नवनिर्माण गौरव पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संस्था उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, खजिनदार शरद कदम, परेश पाडगावकर, संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोहन खातू हे नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील संस्थापक संचालक. संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी सेक्रेटरी म्हणून महत्त्वाची भूमिका सांभाळली.

रत्नागिरीतील एस. एम. जोशी विद्यानिकेतन परिसरात उभारण्यात आलेले मोहन खातू क्रीडा संकुल हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पहिले इनडोअर बास्केटबॉल कोर्ट आहे. संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हे संकुल पूर्णत्वास आले आहे. कोकणात क्रीडा विश्वात ही एक क्रांती असून रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनाही याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कोकणातील क्रीडा विश्वातून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्यासह उपस्थितीत मान्यवरांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button