Uncategorized

लांजा- लिंगायत वाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

वनविभागाने रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात केली मुक्तता

लांजा : तालुक्यातील लिंगायत वाडी येथे राजू लिंगायत यांच्या मालकीच्या विहिरीत १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडल्याची माहिती श्री. लिंगायत यांनी वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना दूरध्वनी वरून दिली. या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवास मुक्त करण्यात आले.

त्यानंतर तात्काळ त्यांच्यासमवेत लांजा येथील रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात अंदाजे २० फूट खोल आयताकृती असलेल्या विहिरीत बिबट्या पडलेला निदर्शनास आला. त्याला तात्काळ दोरीच्या सहाय्याने चौफळा विहिरीत सोडून दिले आणि त्याचा आधार देऊन बिबट्याला सुरक्षित बसण्याची जागा करण्यात आली.

त्यांनतर ८.३० वाजण्याच्या सुमारास विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. या पिंजऱ्यात बिबट्याने दोन मिनिटात प्रवेश केला असतात तात्काळ त्याला पिंजऱ्याचे झाकण बंद करून जेरबंद करण्यात आले. त्यांनतर पशुधन विकास अधिकारी लांजा श्रीमती बर्गे यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून घेण्यात आली. तसेच बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केली .

हा बिबट्या हा नर असून बिबट्याचे अंदाजे वय ४ वर्ष आहे. ही रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल लांजा सारीक फकीर, वनपाल सामाजिक वनीकरण लांजा एम. जी. पाटील व वनपाल संतोष परशेट्ये, वनरक्षक लांजा बाबासाहेब ढेकळे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक पाली श्री. प्रभू साबणे, वनरक्षक सामाजिक वनीकरण लांजा सिद्धार्थ हिंगमीरे, नगरसेवक राजू हळदणकर, पप्पू मुळे, पोलीस विभागाचे श्री. बजागे, श्री. नावलेकर, श्री. मुजावर व श्रीमती मोहिते, महेश लांजेकर, संकेत कुंभार, विशाल लिंगायत, सुनील कानडे तसेच लांजा ग्रामस्थ उपस्थित होते.

हा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवास मुक्त करण्यात आले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वनाधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button