मुख्य बातमी

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वजण वाट बघत असलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर आज भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आज मध्यरात्रीपासून लागू होईल. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ३० ऑक्टोबर अर्ज छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

व्होटर ॲपवर मतदार त्यांची माहिती तपासू शकतात. पैसे मद्य ड्रग्जच्या वाटपावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मतदान केंद्र २ किलोमीटरच्या अंतर्गत असेल. मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरुन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्ण पणे पारदर्शकता बाळगण्यात येईल, मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ९३ लाख पुरुष तसेच ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंघ २८८ आहेत. त्यापैकी २५ अनुसूचित जाती तर २९ अनुसूचित जमीतीसाठी राखीव आहेत.

महाराष्ट्रात १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. झारखंड आणि महाराष्ट्रात भेट घेतली. तिथे राजकीय पक्षांबरोबर इतरांशी चर्चा केली. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button