मुख्य बातमीराजकीय

रेल्वे स्टेशन येथील रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वच्छता गृह होण्याची भाजपाच्या वतीने मागणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत तात्काळ दिल्या सूचना

रत्नागिरी : रेल्वे स्थानक सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा काल (९ ऑक्टोबर) पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा व्यवसायिकांसाठी स्वच्छता गृह आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. श्री. चव्हाण यांनी याबाबत तात्काळ सूचना केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे.

स्वच्छतागृहाची व्यवस्था झाल्यास रिक्षा व्यावसायिक यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, उमेश देसाई, संकेत कदम, संतोष बोरकर, नीलेश आखाडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button