मुख्य बातमीराजकीय
रत्नागिरी शहरात मुख्यमंत्र्यांच्या भल्या मोठ्या लागलेल्या बॅनरवरून होत आहे चर्चा

रत्नागिरी : शहरातील जेल रोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लक्षवेधी ठरत असून, हे भले मोठे बॅनर लागल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन’ असा उल्लेख असून सेवाभावी, मेहनती, कष्टाळू आणि सामान्य लोकांसाठी झटणारा असा उल्लेख आहे. या बॅनरकडे शहरातील जनतेचे लक्ष जात असल्याने बॅनर लक्षवेधी ठरले आहे
या बॅनरच्या खाली शुभेच्छुक म्हणून उदय सामंत यांचे नाव आहे. रत्नागिरीमध्ये प्रथमच एवढा भला मोठा बॅनर लागल्याने नाक्या-नाक्यावरती चर्चा होत आहे. दरम्यान, शहरातील जयस्तंभ, मारुती मंदिर अशा वर्दळीच्या ठिकाणी असे अजून दोन, तीन बॅनर उभे करण्यात येणार असल्याचे समजते.




