पितांबरी चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पितांबरी चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ देवरुख, मधली आळी येथील चितामणी मंगल कार्यालयात ५ व ६ ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या उत्साहात झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर श्रीहरी सौचे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सदस्य विनय गांगण, प्राजक्ता देसाई, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी व खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन सेक्रेटरी मिलिंद साप्ते, जुने मानांकित खेळाडू दिलीप विंचू, पितांबरी प्रॉडक्ट्सचे विक्रेते वैभव साने, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेतील काही सामन्याचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिअशनतर्फे पहिलांद्याच यु-ट्यूबवर दाखविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल असा : पुरुष एकेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध राहुल भस्मे (२०-१०), (२५-१०). उपांत फेरी १ – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध अभिजित खेडेकर (२५- ११), (२५-००). उपांत फेरी २ – राहुल भस्मे विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर (२५-१३), (२१-१६). पुरुष दुहेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण/दत्ताराम वासावे विजेता विरूद्ध सौरभ महाकाळ/दिनेश पारकर (२५-००), (११-०८). उपांत्य फेरी १- अभिषेक चव्हाण/दत्ताराम वासावे विजेता विरूद्ध ओम पारकर/नीलेश निवळकर (११-१२), (१२-०६), (१८-००). उपांत फेरी २ – सौरभ महाकाळ/दिनेश पारकर विजेता विरूद्ध राहुल कदम/राजेंद्र कदम (०६-०२), (२१-००). कुमार गट अंतिम फेरी- ओम पारकर विजेता विरूद्ध द्रोण हजारे (१४-००), (०८-१६), (१०-०४). किशोर गट अंतिम फेरी – स्मित कदम विजेता विरुद्ध सर्वेश आमरे (१५-०४), (०९-०५). किशोरी गट अंतिम फेरी- स्वरा कदम विजेता विरुद्ध स्वरा मोहीरे (१०-०५), (१०-०९).





