महिला जगतमुख्य बातमी

महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या महिला बालविकास विभागाअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याच्या विविध योजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांनी पीपीटी द्वारे दिली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने महिलांना आरोग्याच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य स्टॉलला भेट देणाऱ्या महिलांना माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, आरोग्यसेवक संजय साळवी, केशर आंबेकर, साहिश भोसले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button