मुख्य बातमीशैक्षणिक

भारत संचार निगम लिमिटेड वर्धापन दिनानिमित्त रेखाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण

रत्नागिरी : भारत संचार निगम लिमिटेडचा (बीएसएनएल) २५ वा स्थापना दिन १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रेखाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील बीएसएनएल उपमहाप्रबंधक अरुण चवळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन कांबळे व अमृता लेले, बीएसएनएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सहभागी शाळांचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी ‘स्मार्ट लर्निंग युजिंग बीएसएनएल भारत फायबर’ या विषयावर ही स्पर्धा झाली होती. यामध्ये रत्नागिरीतील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक दोन या शाळांनी सहभाग घेतला होता. प्रथम बक्षीस अस्मित कुंभवडेकर, द्वितीय अंशिका निकंबे आणि तृतीय स्वरा आठल्ये (कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी) यांना देण्यात आले. बीएसएनएलकडून विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, बक्षीस आणि अनुक्रमे एक वर्ष, सहा महिने आणि तीन महिने मोफत एफटीटीएच कनेक्शन देणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button