मुख्य बातमी

शेतकरी लाकूड व्यापारी संघटननेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी : शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेतर्फे आज (७ ऑक्टोबर) मराठा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात जिल्हाभरातून लाकूड व्यापारी सहभागी झाले होते.

झाडतोड दंडाच्या कारवाईला अधिसूचना काढून या सरकारने ५० हजारांचा दंड लावला आहे. हा दंड आम्हाला मान्य नसून शेतकऱ्यांना तो भरणे कठीण आहे. यासाठी वारंवार सरकार दरबारी जाऊन वनमंत्रांची भेट घेऊन हे ज्वलंत विषय त्यांच्यासमोर मांडले; मात्र त्यांनी दाद दिली नाही. म्हणून आज आम्ही हा निषेध मोर्चा काढत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पालांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यात आला आहे त्यालाही आमचा विरोध असून झाड तोडीसाठी दोन वेळा प्रतिज्ञापत्र करावी लागतात त्यासाठी १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राऐवजी ५०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र दोन वेळा करावे लागते. त्यालाही आमचा विरोध आहे सरकार आपली मनमानी करत असून शेतकऱ्यांना भेटीस धरत आहे याच्या निषेधार्थ जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी एकत्र याचा निषेध केला आहे, असे श्री. पालांडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button