महिला जगतमुख्य बातमी

रत्नागिरी शहरातील प्रभाग ५, ६ मधील महिलांना सौ. पूजा पवार यांनी घडवले देवी दर्शन

सौ. पूजा दीपक पवार यांचा गेली तीन वर्ष उपक्रम

रत्नागिरी : दरवर्षी नवरात्र आले की रत्नागिरी परिसरातील देवींचे दर्शन घेण्याची इच्छा असते; मात्र काही ना काही कारणाने राहुन जाते. गेली तीन वर्षे मात्र पूजा वहिनींच्या मुळे आम्हाला कोणताही त्रास न होता अत्यंत सुखदायी असे देवी दर्शन घडले आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक पाच आणि सहाच्या महिलांनी व्यक्त केल्या.

नवरात्रीचा उत्सव सुरू झाला की महिलांना वेध लागतात, आदिशक्तीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी ओटी म्हणजेच आपली सेवा अर्पण करण्याचे! मात्र दैनंदिन कामकाज आणि प्रवासाच्या अडचणी ध्यानात घेऊन बऱ्याचदा महिलांना हा देव दर्शनाचा बेत रद्द करावा लागतो. गेली तीन वर्ष मात्र सौ. पूजा दीपक पवार यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन प्रभाग क्रमांक पाच आणि सहाच्या महिलांना गाड्या आणि नियोजन करून दिल्यामुळे दरवर्षी जवळपास १३० महिला त्यांनी दिलेल्या या सुविधेचा लाभ घेत आहेत.

या दर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, शहर संघटक बिपीन बंदरकर, ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे, ज्येष्ठ उद्योजक दीपक पवार उपस्थित होते.

पूजा पवार यांनी रत्नागिरी येथून सहा गाड्यांची व्यवस्था करून महिलांना मोफत देवी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभागातील महिलांनी त्यांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील शिवलकर, शिवानी पवार, सेजल शिंदे, काव्या कामतेकर, अंजली सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button