मुख्य बातमी
भाट्ये-खोतवाडी येथील श्री लक्ष्मीकांत-रवळनाथ नवरात्रोत्सव मंडळातर्फे बाळ माने यांचा सत्कार

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खोतवाडी येथील श्री लक्ष्मीकांत-रवळनाथ नवरात्रोत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या भव्य उत्सवासाठी माजी आमदार तथा रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी सहकुटुंब उपस्थित राहून देवीआईचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. माने आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार व स्वागत केले.
मंडळाच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वायंगणकर यांनी केले. यावेळी या कार्यक्रमासाठी भाट्ये गावचे मानकरी, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अन्य प्रतिष्ठित नागरिक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



