मुख्य बातमीराजकीय
जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून आपल्या कार्यकर्त्यांसह आज (५ ऑक्टोबर) पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
याबाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत त्यानी आणली. ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आणि तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार, असा विश्वास आबा घोसाळे यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केला.



