नागपूर – मडगाव जंक्शन आणि उधना – मंगळुरू जंक्शन या द्वि साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्या सुरू राहणार

रत्नागिरी : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने नागपूर – मडगाव जं. – नागपूर आणि उधना जंक्शन. – मंगळुरू जं. द्वि- साप्ताहिक विशेष या गाड्या कोकण रेल्वे मार्गांवर पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेन क्र. ०११३९/०११४० नागपूर – मडगाव जं. – नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष मान्सूनच्या वेळेनुसार आठवड्यातील बुधवार आणि शनिवार या दिवशी २८ सप्टेंबरपर्यंत धावणार होती ती ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११४० मडगाव जं. – नागपूर ही गाडी आठवड्यातील गुरुवार आणि रविवार या दिवशी २९ सप्टेंबरपर्यंत धावणार होती. ती ३१ ऑक्टोबरपर्यंत धावेल.
गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर – मडगाव जं. – नागपूर द्वि-साप्ताहिक स्पेशल : गाडी क्र. ०११३९ नागपूर – मडगाव जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आठवड्यातील बुधवार आणि शनिवार या दिवशी धावते. ती २८ डिसेंबरपर्यंत धावेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११४० मडगाव जं. – नागपूर ही गाडी गुरुवार आणि रविवार या दिवशी २९ डिसेंबरपर्यंत धावेल.
गाडी क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. द्वि- साप्ताहिक विशेष ही गाडी आठवड्यातील बुधवार आणि रविवार या दिवशी धावते. ती ३० ऑक्टबरपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. आता ती ८ जानेवारी २०२५ पर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि- साप्ताहिक विशेष आठवड्यातील गुरुवार आणि सोमवार या दिवशी ३१ ऑक्टोबपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता ९ जानेवारी २०२५ पर्यंत धावेल.



