मुख्य बातमी
महावितरणतर्फे साडवली येथे उद्या विशेष शिबिराचे आयोजन

संगमेश्वर : महावितरण शाखा कार्यालय कोसुंब येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने उद्या (१९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता साडवली ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त वीज बिल योजनेची माहिती देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या योजनेचे मार्गदर्शन करण्यासाठी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री. आळवेकर तसेच विशेष मार्गदर्शन करण्यासाठी सोलार एजन्सी चे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.
महावितरण कंपनीच्या सर्व वीज ग्राहकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



