Uncategorized

विसर्जन वाहनाशिवाय इतर सर्व वाहनांना १२ व १७ सप्टेंबर रोजी प्रवेश बंद

रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांचे वाहन यांव्यतिरिक्त तसेच भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता गणपती विसर्जनासाठी गणपती ठेवलेले वाहनाव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना १२ सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी गणपती विसर्जन या दिवशी प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ व ११६ नुसार प्राप्त अधिकारान्वये १२ सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन, आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी गणपती विसर्जन या दिवशी भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांचे वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता गणपती विसर्जनासाठी गणपती ठेवलेले वाहनाव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केल्याचा आदेश जारी केले आहेत. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button