Uncategorizedमुख्य बातमी

जिल्ह्यात आज १ लाख बाप्पांना निरोप

समुद्र किनार्‍यावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

रत्नागिरी : जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज (१२ सप्टेंबर) गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात १ लाख १५ हजार २३४ घरगुती, तर १७ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. पोलिस दलातर्फे समुद्र किनार्‍यावर गर्दी टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे ढोलताशांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. त्यानंतर दीड दिवसाच्या १२ हजार गणपतींचे विसर्जन झाले. यानंतर शहरातील भाट्ये व मांडवी किनारी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा पाणवठ्यावर विसर्जन होते. पाच दिवस मंगलमय वातावरणात गणेशाची पुजा-अर्चा झाली. ग्रामीण भागात आरत्या, भजनांसह विविध कार्यक्रमही झाले. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आज नदी किनारी-पाणवठ्यावर घरगुती तर समुद्रकिनार्‍यावर सार्वजनिक गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे.

पाणवठ्यावर अथवा रस्त्यावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात पोलिस पाटलांनाही सूचना देऊन प्रशासनाने योग्य नियाजन केले आहे. गर्दी टाळण्यासाठी गाडीबरोबर असलेल्या गणेशभक्तांना किनार्‍यावर सोडण्यात येणार असल्याचे आदेश यापूर्वीच भक्तगणांना देण्यात आले आहेत. येथील मांडवी चौपाटीकडे जाणार्‍या चौकातच बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे कलश उभारण्यात आले आहे. तसेच पालिकेकडून गणेशमूर्ती संकलनासाठी एक गाडीही ठेवण्यात आली आहे. मांडवी किनारी चार रस्त्यावर पहिला पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यानंतर मांडवी नाक्यावर पोलिसांचा ताफा असणार असून किनाऱ्यावर पोलिसांच्या पथकाची नजर असणार आहे. मांडवी किनारी विसर्जनासाठी येणाऱ्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण पोलिस ठाणेनिहाय खासगी व सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या अशी : रत्नागिरी शहर ५ हजार ८२५, ग्रामीण ७ हजार ८५९, जयगड १ हजार ७३५, संगमेश्वर ९ हजार १८३, राजापूर १० हजार ६७४, नाटे ४ हजार ६३४, लांजा ११ हजार ७७०, देवरूख ८ हजार २९५, सावर्डे ९ हजार ३२२, चिपळूण ९ हजार ८४७, गुहागर ९ हजार १५०, खेड १० हजार ६३२, अलोरे ५ हजार ३५०, दापोली २ हजार ५००, मंडणगड २ हजार ८४४, बाणकोट ३९५, पूर्णगड ४ हजार ३२१, दाभोळे ८९८, तर सार्वजनिक १७ असे एकूण १ लाख १५ हजार २३४ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button