Uncategorized

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात बँकिंग अँड इन्शुरन्स विषयावर सेमिनार

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात ‘ओव्हर व्ह्यू ऑफ बँकिंग सेक्टर अँड इन्शुरन्स सेक्टर’ याविषयावर नुकतेच सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यात बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक राजीव कुमार आणि शुभम सिन्हा यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य व्यवस्थापक शुभम सिन्हा यांनी व्यवसाय वृद्धीमध्ये बँकांचे महत्त्व विषद करतानाच कर्ज वितरण आणि कर्ज वसुली यांविषयी माहिती दिली. विम्याविषयी बोलताना त्यांनी जीवन विमा (लाईफ इन्शुरन्स), आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) आणि साधरण विमा (जनरल इन्शुरन्स) हे विम्याचे प्रकार, त्यातील फरक आणि प्रत्येक विमा प्रकारचा फायदा याची विविध उदाहरणांसहित सविस्तर माहिती दिली.

मुख्य व्यवस्थापक राजीव कुमार यांनी बँकांचे कामकाज कसे चालते हे सांगतानाच बचत खाते, करंट खाते, टर्म डीपॉसीट यांची, तसेच कर्जांच्या कॅश क्रेडिट लिमिट, ओव्हर ड्राफ्ट, टर्म लोन या प्रकारांबद्दल त्यांच्या कालावधींसह सविस्तर माहिती दिली. म्युच्युअल फंड, एसआयपी, एसडब्ल्यूपी शेअर मार्केटविषयीही मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्र, IBPS ही बँकिंगची परीक्षा कशी दिली जाते, त्याची निवड प्रक्रिया कशी असते याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. पूजा मोहिते, प्रा. सुशील साळवी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाच्या प्रा. सोनिया मापुस्कर यांनी केले. नाझ वाहिद या विद्यार्थिनीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button