मुख्य बातमी

नीलेश आखाडे पुरस्कृत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : शहर प्रभाग क्रमांक ६ या भागामध्ये नीलेश आखाडे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात अनेक गणेशभक्तांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अजूनही दोन दिवस शिल्लक आहेत.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर, खासदार नारायण राणे, माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये नीलेश आखाडे प्रस्तुत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अजूनही यामध्ये कोणाला सहभागी होण्याची इच्छा असेल, तर दोन दिवसात आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ ९८६०६२५७४० या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन नीलेश आखाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button