रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध
मारुती मंदिर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर अभिषेक

रत्नागिरी : मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आज (२९ ऑगस्ट) सकाळी महाविकस आघाडीच्या वतीने रत्नागिरीतील मारुतीमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर ८ महिन्यांपूर्वी नौदलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचा फटका बसला. दोन दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. शिवसेनेतर्फे या घटनेचा निषेध नोंदवत घोषणाबाजीही केली.
यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हाप्रमुख उदय बने, उप जिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपतालुका प्रमुख अभय खेडेकर, उपतालुका संघटक सुभाष पावसकर, युवासेना तालुका प्रमुख आणि शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमंत खातू, शिवसेना कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, उप शहरप्रमुख नितिन तळेकर, बावा चव्हाण, विभाग प्रमुख किरण तोडणकर, सलील डाफळे, अमित खडसोडे, अल्पसंख्यक शहर प्रमुख जाकी खान, युवासेना उपतालुका प्रमुख संदेश नारगुडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रांतिक सदस्य कुमार शेट्ये, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक संध्या कोसूंबकर, ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




