मुख्य बातमी

संकटग्रस्त बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा

रत्नागिरी : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागामार्फत ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४X७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर वर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे (भा.प्र.से), आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळ्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, यासाठी कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button