मुख्य बातमीशैक्षणिक

‘नवनिर्माण हाय’मध्ये दहीहंडी उत्सव साजरा

रत्नागिरी : “गोविंदा….. रे गोपाळा….”च्या जल्लोषपूर्ण वातावरणात नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काल (२६ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी राधा आणि कृष्णाची आकर्षक वेशभूषा साकारली होती. प्रथम मुलांनी आणि मुलींनी तीन थरांची सलामी दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर थिरकत वातावरण आणखी जल्लोषपूर्ण केले. यामध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button