मुख्य बातमी

कुवारबाव-रवींद्रनगरच्या लेकीचे नेत्रदीपक यश

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान

रत्नागिरी : शहरनजिकच्या कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील रवींद्रनगर येथील नीलम गडदे हिने स्वतःच्या हिमतीवर आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पोलीस पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे तिची आता रत्नागिरी पोलीस दलात निवड झाली आहे. याबद्दल शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने तिचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी युवासेना तालुका प्रमुख तुषार साळवी, युवासेना विभाग प्रमुख अमित तोडकरी, उपविभाग प्रमुख अभिजीत घोडके, नीलेश अवेरे, संजय नाईक आणि शाखाप्रमुख मधुरा काणे, शिवदूत सुनीता तेली, शोभा पाटील, रेखा कोळेकर, शरयू झाडगावकर, वनीता पाटील, वैभवी पावस्कर,, रत्नप्रभा भडेकर यांच्या उपस्थितीत नीलमचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button