मुख्य बातमीराजकीय

मनसे रस्ते साधन-सुविधा व आस्थापना रत्नागिरी कार्यकारणीत नवनियुक्त्या

राज ठाकरे यांचे तरुण फळीचे शिलेदार सक्रीय

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष वाढीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना रत्नागिरी तालुका तसेच शहर कार्यकारणीत आज (१६ ऑगस्ट) रस्ते आस्थापना अध्यक्ष योगेश परुळेकर, उपाध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच द. जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या उपस्थितीत जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर यांच्या पुढाकाराने नवनियुक्त्या जाहीर केल्या.

यामध्ये अनंत गजानन शिंदे – तालुका संघटक (रत्नागिरी), सुनील दिगंबर पारकर – उप तालुका संघटक (नाचणे ग्रामपंचायत ), शक्ती मयेकर – उपतालुका संघटक (कुवारबाव ग्रामपंचायत), साहिल वीर – शहर संघटक (रत्नागिरी शहर), ऋषीकेश रसाळ – प्रभाग संघटक (प्रभाग १ ते ४), अनिल दिगंबर पारकर – प्रभाग संघटक (नाचणे ग्रामपंचायत), सौरभ गायकवाड – उप तालुका संघटक (शिरगाव-मिरजोळे ग्रामपंचायत ), अमोल साळवी (प्रभाग संघटक ५ ते ८) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीप्रसंगी दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे, रत्नागिरी जिल्हा संघटक अजिंक्य केसरकर, माजी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (छोटू) खामकर, उपतालुका संघटक अक्षय चव्हाण आदी महाराष्ट्र सैनिक सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.

यापुढे ही मनसे रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना प्रशासनाकडे रत्नागिरीकरांचे सर्व प्रश्न जोर लावून धरणार आणि सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणार असल्याचे अजिंक्य केसरकर यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button