मुख्य बातमीशैक्षणिक

नवनिर्माण शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ध्वजारोहण सोहळा संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग, नवनिर्माण हायचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नवनिर्माण हायमधील मुलांनी देशभक्ती गीत सादर करतानाच मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्र उभारणीत आपलाही हातभार असावा असे विद्यार्थ्यांना सांगतानाच सौ. हेगशेट्ये यांनी राष्ट्र प्रेम केवळ सीमेवर लढूनच व्यक्त केले असे नाही तर वाहतुकीचे नियम पाळून, माणुसकीच्या नात्याने मदत करून, कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकून ही व्यक्त केले जाते, असे सांगितले.

यानंतर सर्वांना वडा आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button