Uncategorized

कोकण रेल्वेकडून “लॉंग वीकेंड स्पेशल ट्रेन”ची घोषणा 

आजपासून ऑनलाइन तसेच संगणकीकृत आरक्षणाला सुरुवात 

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन आणि त्यानंतर जोडून आलेल्या शनिवार-रविवार अशा सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान अशा विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच संगणकीकृत आरक्षण खिडकीवर सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झाले आहे.

गाडी क्र. ०११४९/०११५० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष : गाडी क्रमांक ०११४९ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जंक्शन ही विशेष गाडी १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री ९ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११५० मडगाव जंक्शन- लोकमान्य टिळक (टी) विशेष गाडी १६ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ती ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्टेशन या ठिकाणी थांबेल.

या गाडीला एकूण २१ एलएचबी कोच असून यात २ टायर एसीचे २ कोच, ३ टायर एसीचे ६ कोच, स्लीपरचे ८ डब्बे, जनरलचे ३ डबे, जनरेटर कार १ आणि एसएलआर १ अशी यांची रचना असेल.

दरम्यान, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान रेल्वेने लॉंग वीकेंड स्पेशल गाडीचे आरक्षण ऑनलाइन तसेच संगणकीकृत आरक्षण खिडकीवर सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झाले आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button